कान्होबाची वाडी येथे ५१ लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:35 AM2021-08-23T04:35:09+5:302021-08-23T04:35:09+5:30

शिरूर कासार : तालुक्यातील कान्होबाची वाडी येथील विविध कामांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सकाळी झाला. ५१ लाखांची विविध कामे पूर्ण ...

Dedication of works worth Rs. 51 lakhs at Kanhobachi Wadi - A - A | कान्होबाची वाडी येथे ५१ लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण - A - A

कान्होबाची वाडी येथे ५१ लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण - A - A

googlenewsNext

शिरूर कासार : तालुक्यातील कान्होबाची वाडी येथील विविध कामांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सकाळी झाला. ५१ लाखांची विविध कामे पूर्ण झाल्यानंतर माजी मंत्री आमदार सुरेश धस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. अध्यक्षस्थानी कानिफनाथ संस्थानचे महंत श्रीरंग स्वामी, तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार, उषाताई सरवदे, चंपा पानसंबळ, शिरूर नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील, दत्ता पाटील, प्रकाश देसरडा, निवृत्ती बेदरे, कल्याण तांबे, प्रल्हाद धनगुडे, माजी सरपंच बबनराव मोरे पाटील, अशोक मोरे होते.

कान्होबाची वाडी ग्रामपंचायत भुवन १८ लाख , अंगणवाडी ८ लाख, पेव्हिंग ब्लाॅक ८ लाख, सिमेंट रस्ते १२ लाख, तर हायमॅस्क दिवे ५ लाख असे एकूण ५१ लाखांच्या कामांनी वाडीच्या वैभवात भर पडली आहे. आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून वाडीचा कायापालट होण्यास मदतच झाली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

यावेळी नगरसेवक गणेश भांडेकर, अरुण भालेराव, आनंद जावळे, दादा हरिदास, रणजित कदम, अशोक कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

190821\553404245029vijaykumar gadekar_img-20210819-wa0032_14.jpg

Web Title: Dedication of works worth Rs. 51 lakhs at Kanhobachi Wadi - A - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.