सल्लागारपदी दीपक कांकरिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:12+5:302021-03-16T04:33:12+5:30
पाटोदा : वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पाटोदा शाखा सल्लागारपदी व्यापारी दीपक नेमीचंद कांकरिया यांची निवड करण्यात आली आहे. भाजप ...
पाटोदा : वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पाटोदा शाखा सल्लागारपदी व्यापारी दीपक नेमीचंद कांकरिया यांची निवड करण्यात आली आहे. भाजप राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, बँक अध्यक्ष अशोक जैन यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. बँकेच्या हिताच्या दृष्टीने विविध उपक्रमात योगदान देणार असल्याचे कांकरिया यांनी सांगितले. या निवडीबद्दल कांकरिया यांचा शाखेत सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सूचनांचे पालन गरजेचे
बीड : पहिल्या टप्प्यात नागरिकांच्या सहकार्याने कोरोनावर मात करता आली. आता नव्याने पुन्हा नव्याने हे आव्हान समोर येत असून, यासाठी मास्क, सामाजिक अंतर सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे.
सूर्यफूल पीक बहरले
बीड : बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने जिल्हाभरात पिकेही चांगली बहरली. तेलगाव परिसरात जिल्ह्यात क्वचित घेतले जाणारे सूर्यफुलाचे पीक चांगलेच बहरात आहे. यामुळे अनेक शेतकरी वेगळी पिके घेताना दिसत आहेत.
गॅसचा गैरवापर
बीड : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते.
पुलांचे कठडे गायब
बीड : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाइप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे वाहनांना पुलावरून जाताना धोका निर्माण होत आहे.
रेतीचे दर वाढले
बीड : तालुक्यात गेल्या दोन वर्षांत रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. १५ ते १६ हजारांची वाळू गाडी आता ४० हजारांना मिळत आहे.