परळी येथील कृउबाच्या जागेतील अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:39 AM2017-11-29T00:39:55+5:302017-11-29T00:41:52+5:30
परळी येथील नाथरोडवरील बाजारसमितीच्या जागेतील २०० घरांचे अतिक्रमण मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काढले. कारवाईदरम्यान दुपारी महसूल आणि पोलीस अधिका-यांवर मिरचीची पूड फेकून दगफेक करण्यात आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला.
परळी : येथील नाथरोडवरील बाजारसमितीच्या जागेतील २०० घरांचे अतिक्रमण मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काढले. कारवाईदरम्यान दुपारी महसूल आणि पोलीस अधिका-यांवर मिरचीची पूड फेकून दगफेक करण्यात आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला.
बाजार समितीच्या वतीने शहरातील नाथरोड वरील राजीव गांधी नगरमधील सर्व्हे नं. ४९९ मधील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यास दुपारी सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील लोक संतप्त झाले. मिरचीची पूड अधिकाºयांच्या दिशेने फेकण्यात आली. तसेच दगडफेकही करण्यात आली. मोठा जमाव होत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
दरम्यान, सकाळपासून रस्त्यावरच लोकांनी ठिय्या मांडला होता. दुपारपासून अतिक्रमण काढणे सुरु केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद, नायब तहसीलदार सदानंद बर्दाळे यांच्यासह १२५ पोलीस, महसूल, न.प., बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते.