आष्टीत अपुऱ्या यंत्रणेमुळे रुग्णसेवेत दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:34 AM2021-04-22T04:34:57+5:302021-04-22T04:34:57+5:30
अविनाश कदम आष्टी : येथील कोविड केअर सेंटरमध्ये २७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा ...
अविनाश कदम
आष्टी : येथील कोविड केअर सेंटरमध्ये २७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आयटीआय येथे १८५ खाटांचे तर ट्रामा केअर येथे १०० खाटांचे सेंटर तरी या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दाखल होतात. रुग्णांची देखभाल आणि उपचार करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचारी अपुरे आहेत. सध्याच्या घडीला ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत असल्याने काही रुग्णांना या सुविधा मिळत नाही, लाखो रुपये खर्च करून अहमदनगर, पुणे येथे जाऊन खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतात, त्याचा परिणाम थेट जीव गमावण्यावर येत आहे.
वरिष्ठांकडे पाठपुरावा
रेमडेसिविर इंजेक्शन गेल्या आठवड्यापासून तुटवडा आहे. भविष्यात बेड व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार आहे. वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. - डॉ.राहुल टेकाडे ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, कोविड सेंटर प्रमुख, आष्टी.
वॉररुमद्वारे निराकरण
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आम्ही तहसील कार्यालयात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने वार रूम सुरू केले असून, एक तासाच्या आत नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला जातो.
- राजाभाऊ कदम तहसीलदार, आष्टी.
स्वच्छतेचा अभाव
कोविड केअर सेंटरमधील शौचालयामध्ये दुर्गंधी पसरली आहे. दररोज स्वच्छता केली जात नाही. आता अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे जेवण जात नाही. परिसरसुद्धा सॅनिटाइझ केला जात नसल्याने रुग्णांचे यांना काही देणे-घेणे नाही, अशी माहिती एका कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
===Photopath===
210421\img_20210421_170526_14.jpg