कामाचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:29 AM2021-02-05T08:29:53+5:302021-02-05T08:29:53+5:30
सूचनांकडे दुर्लक्ष सिरसाळा : सिरसाळा व परिसरातील नागरिकांचा रोज परळीशी संपर्क असतो. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना ...
सूचनांकडे दुर्लक्ष
सिरसाळा : सिरसाळा व परिसरातील नागरिकांचा रोज परळीशी संपर्क असतो. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन आवश्यकता नसेल तर परळीला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीदेखील नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे.
अवैध धंदे जोमात
पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.
झेंडू, गलांड्याच्या फुलाचे भाव घसरले
बीड : दिवाळी सणानिमित्त झेंडू, गलांड्याच्या फुलाचे भाव वाढले होते. यावेळी १०० ते २०० रुपये किलो दराने प्रतवारीनुसार फुलांची विक्री झाली. दरम्यान सण, समारंभ झाल्यानंतर फुलांच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, २० ते ५० रुपये दराने फुलांची विक्री होत आहे. घसरलेल्या दरामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, उत्पादन खर्च निघणेदेखील अशक्य झाले आहे.