नुकसानीपोटी ५१५ कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:54 PM2019-11-12T23:54:46+5:302019-11-12T23:55:21+5:30
बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे कृषी पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील ७ लाख ५६ हजार ९२६ ...
बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे कृषी पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील ७ लाख ५६ हजार ९२६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, यासाठी ५१४ कोटी ८० लक्ष ५४ हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शासनाकडे पाठविला आहे.
जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतक-यांमधून नुकसानभरपाई तात्काळ मिळावी, अशी माागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश गाव पातळीवरील यंत्रणांना दिले होते. या अनुषंगाने प्राप्त झालेली माहिती एकत्रित करून जिल्ह्यातील बाधित क्षेत्र, शेतकºयांची संख्या आणि नुकसान भरपाई देण्यासाठी अपेक्षित निधी यांची तालुकानिहाय माहिती यासोबत सादर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५९ शेतकºयांना अतिवृष्टीचा फटका बसला असून पेरणी झालेल्या ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत पीक हातातून गेले आहे. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस , मका , बाजरी, ज्वारी, तूर, मूग, द्राक्ष , पपई ह्यासह विविध पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी कमीत कमी वेळेत पंचनामे करून अहवाल सादर केले आहेत. त्याबद्दल त्यांच्या कामाचे कैतूक सर्वत्र होत आहे.
तालुकानिहाय मिळणार
अशी नुकसान भरपाई
गेवराई तालुक्यातील १ लाख ३६ हजार५२१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १२८५१० शेतकºयांसाठी ७९ कोटी ७७ लक्ष ५५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. बीड तालुक्यातील १ लाख ३४ हजार ३२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १३०९१८ शेतकºयांसाठी ८४ कोटी ७६ लक्ष २० हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. केज तालुक्यातील १ लाख ०५ हजार २१६ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १०१०१८ शेतकºयांसाठी ६७ कोटी ३१ लक्ष २५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. आष्टी तालुक्यातील १ लाख २३ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ७४५४५ शेतकºयांसाठी ३८ कोटी १८ लक्ष ८० हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. माजलगाव तालुक्यातील ७६ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६९०६६ शेतकºयांसाठी ४६ कोटी २६ लक्ष ६५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ७७ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६८२४८ शेतकºयांसाठी ४७ कोटी ५६ लक्ष ३९ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. पाटोदा तालुक्यातील ६६ हजार ४५४ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ५७१६२ शेतकºयांसाठी ३३ कोटी ३९ लक्ष ९५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. परळी तालुक्यातील ६१ हजार १०१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६८२४८ शेतकºयांसाठी ३८ कोटी २८ लक्ष ३३ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. शिरूर कासार तालुक्यातील ५४ हजार ५७६ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ५७३१३ शेतकºयांसाठी ३८ कोटी १८ लक्ष ८८ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. धारूर तालुक्यातील ४६ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ४५७६९ शेतकºयांसाठी २७ कोटी ३९ लक्ष २४ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. वडवणी तालुक्यातील ३३ हजार ५७१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ३२३३१ शेतकºयांसाठी १९ कोटी ४२ लक्ष २१ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे.