शाळा खोली बांधकाम प्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:50+5:302021-09-03T04:34:50+5:30
हंगेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार नांदूर घाट : हंगेवाडी येथील शाळा खोलीचे बांधकाम अर्धवट व पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे करण्यात ...
हंगेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार
नांदूर घाट : हंगेवाडी येथील शाळा खोलीचे बांधकाम अर्धवट व पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून मुख्याध्यापकाने ज्ञानदानापेक्षा खोली बांधकामात लक्ष देऊन स्वतः आर्थिक फायदा करून बोगस काम केल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य राधा हंगे यांनी केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. २०१७ मध्ये शाळा खोलीसाठी ६ लाख ७८ हजार रुपये सर्व शिक्षा अभियानातून मंजूर झाले होते. याचा पहिला हप्ता ३ लाख ३९ हजार रुपये मार्च २०२० मध्ये खात्यावर जमा झाला. सर्व गावकरी व शालेय समितीने चांगले काम करण्याबाबत मुख्याध्यापकांवर जबाबदारी दिली. सध्या जे कॉलम उभे केले ते सरळ रेषेत नसून जनावरांचा गोठा करतात तसा करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे स्लॅब खालील बिंब व कॉलम हे हाताने काढले तरी पडत आहे. सिमेंट हाताने पडत आहे. भविष्यामध्ये ही पूर्ण खोली झाल्यावर सहा महिने सुद्धा व्यवस्थित राहू शकणार नाही. अशा ठिकाणी विद्यार्थी कसे बसणार? असा सवाल करीत वरिष्ठ स्तरावर चौकशी करून मुख्याध्यापकाच्या पगारातून पुन्हा शाळा खोली करण्याची मागणी केली आहे, राधा हंगे यांनी केली आहे.
------
प्रधान सचिवांकडे तक्रार
केज तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या शाळा बांधकाम खोली प्रकरणात विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, शालेयमंत्री,प्रधान सचिव, विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
-----------
020921\02bed_2_02092021_14.jpg~020921\02bed_1_02092021_14.jpg