अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:28+5:302021-03-19T04:32:28+5:30
बोगस रस्ताकामाचे तक्रारदार धनंजय गुंदेकर व गणेश बजगुडे यांनी ही निवेदने कोरोनाच्या अनुषंगाने सादर केली. यावेळी उपजिल्हाधिकारी राऊत यांना ...
बोगस रस्ताकामाचे तक्रारदार धनंजय गुंदेकर व गणेश बजगुडे यांनी ही निवेदने कोरोनाच्या अनुषंगाने सादर केली. यावेळी उपजिल्हाधिकारी राऊत यांना या रस्त्याच्या कामाच्या सुमार दर्जाबाबत पुरावे देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली. या रस्त्यावर डांबर चांगल्या प्रकारे टाकण्यात आलेले नाही. जीएसबी थर निकृष्ट असून, एमपीएम अगदी थातूरमातूर करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण पाहिले आहे तेथे नुसता थर देऊन कामाचा दर्जा बोगस करण्याचा सपाटा कंत्राटदाराने लावला आहे. २२ मार्च रोजी या एमडीआर ३२ या जवळा ते चौसाळा रस्त्याच्या दर्जाबाबत प्रथम तक्रार देण्यात आली होती. मात्र, या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिंदे व कुलकर्णी यांना पुराव्यानिशी सर्व बोगस काम दाखवूनही ते या कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. यामुळे सर्व संतप्त गावकऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देत संबंधित कंत्राटदार व त्यांना साथ देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केलेली आहे. यावेळी विलास काकडे, गणेश काळे, नितीन राऊत, चौसाळा येथील अजमेर मनियार, सुफीयान मनियार आदींची उपस्थिती होती.