बसथांब्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:36+5:302021-01-18T04:30:36+5:30
बीड : तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या खजाना विहिरीजवळ बसथांबा करावा, अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे. हे ठिकाण ऐतिहासिक असल्याने ...
बीड : तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या खजाना विहिरीजवळ बसथांबा करावा, अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे. हे ठिकाण ऐतिहासिक असल्याने येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांची गर्दी होते. वाहनांअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी येथे बसथांबा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गुटखा विक्री तेजीत
पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील टपऱ्या, दुकानांवर सर्रासपणे गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने येथे कारवाई करणे गरजेचे आहे. मागील अनेक दिवसांपासून शहरासह तालुक्यात कारवाई झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.
स्वच्छतेची मागणी
वडवणी : शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने ते सुंदर बनले आहेत. परंतु, या दुभाजकाशेजारी घाण झाल्याने हा परिसर अस्वच्छ दिसू लागला आहे. त्यामुळे नगर पंचायतने दुभाजकाच्या बाजूंची स्वच्छतेची मागणी नागरिकांतून होत आहे.
वाहनचालकांकडून नियमांची अवहेलना
केज : शहर व परिसरात वाहन चालकांकडून सातत्याने नियमांची अवहेलना सुरू आहे. दुचाकी वाहने व अॅाटोरिक्षा सर्रास वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र सर्रास पाहायला मिळते. शहरात तर मुख्य रस्त्यावर अनेक रिक्षांची बिनधास्तपणे पार्किंग असते. मोकळ्या जागेत पार्किंग न करता सर्रास रस्त्यावर वाहने लावली जातात.
ठिकठिकाणी होतेय अवैध दारू विक्री
गेवराई : तालुक्यातील गढी परिसरातील हॉटेल, ढाब्यांमधून गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने राजरोस विक्री असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.