बोगस आदेश व नकाशा जोडलेले फेरफार रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:15 AM2021-01-24T04:15:55+5:302021-01-24T04:15:55+5:30
परळी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांशी संगनमत करून बोगस व बनावट अकृषिक आदेश व नकाशा जोडून तसेच तुकडे ...
परळी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांशी संगनमत करून बोगस व बनावट अकृषिक आदेश व नकाशा जोडून तसेच तुकडे बंदीचा भंग करून खरेदीखत दस्त नोंदणी केले आहेत, अशा खरेदीखतांची चौकशी करून फेरफार रद्द करण्याची मागणी ॲड. परमेश्वर गित्ते यांनी केली आहे.
परळी वैजनाथ तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात वाढते शहरीकरण, लोकसंख्या तसेच लोकांना जागेची पडलेली कमतरता यांचा गैरफायदा घेत नागरिकांची लूट करून फसवणूक केली जात आहे. दुय्यम निबंधक कायार्लयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने खोटे व बनावट अकृषिक आदेश व नकाशा जोडून खरेदीखत दस्त नोंदणी केल्याचे ॲड. गित्ते म्हणाले. तसेच तुकडे बंदीचा भंग करून खरेदीखत दस्त नोंदणी केले आहेत. त्यामुळे जनतेची तर फसवणूक झालीच पण शासनाचा कोट्यवधीं रुपयांचा महसूल बुडाला आहे. बोगस अकृषिक आदेश व नकाशा जोडलेला असल्याचे माहीत असतानाही संबंधित गाव कामगार तलाठ्यांनी अशा खरेदीखत दस्तांचे फेरफार घेऊन सातबारा, आठ अ अभिलेख्यावर नोंदी घेतल्या आहेत. तसेच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी खोटे व बनावट आदेश व नकाशे असल्याचे माहीत असतानाही दलालांशी संगनमत करून खोट्या व बनावट अकृषिक आदेश व नकाशा जोडून केलेल्या खरेदीतांच्या नोंदी घेऊन, मंजूर केल्या आहेत. यातून ओपन स्पेस व प्रतिबंधित जमीन विक्री करून शासनाची फसवणूक झाल्याचे ॲड. गित्ते म्हणाले. त्यामुळे मागील पाच वर्षांत झालेल्या शा खरेदीखत फेरफारांची चौकशी करावी. बोगस अकृषिक आदेश व नकाशा जोडून झालेले खरेदी खतांचे फेरफार रद्द करावेत. खोटे व बनावट अकृषिक आदेश व नकाशा बनवनाऱ्यांच्या रॅकेटचा शोध घेऊन दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ॲड. परमेश्वर गित्ते यांनी प्रशासनाकडे केली आहे.