तहसील परिसरात स्वच्छतेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:31 AM2021-03-28T04:31:57+5:302021-03-28T04:31:57+5:30
रस्ता व्यापला खड्ड्यांनी शिरूर कासार : कोळवाडी सिंदफणा, जाटनांदूर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने वाहन चालकासह ...
रस्ता व्यापला खड्ड्यांनी
शिरूर कासार : कोळवाडी सिंदफणा, जाटनांदूर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने वाहन चालकासह प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. अनेक वर्षांपासून रस्ता खराब असल्याने किमान खड्डे तरी बुजवण्याचे काम तातडीने करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नदीपात्रात औषधे; प्रदूषण वाढू लागले
बीड : शहरातील बिंदुसरा नदीपात्रामध्ये कालबाह्य औषधे आढळून येत आहेत. एमआरकडून डॉक्टरांना देण्यात आलेले सॅम्पल औषध कालबाह्य झाल्यामुळे ते औषध नदीपात्रात फेकून दिले जात आहे. याबाबीकडे ना आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे ना नगरपालिकेचे. यासाठी पालिकेने लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
दुभाजकातील झाडे बहरली
बीड : शहरातील दुभाजकांच्या मध्ये नगरपालिकेच्या वतीने सुशोभिकरणासाठी झाडे लावण्यात आली आहेत. पाऊस व पाणी दिल्यामुळे ती चांगलीच बहरली असून, शहराच्या सुशोभित दिसू लागली आहे. या झाडांना नियमित पालिकेकडून पाणी दिले जात असल्याने वाढ चांगलीच होत आहे. मात्र कटई करण्याची देखील गरज आहे.