नुकसानभरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:05+5:302020-12-25T04:27:05+5:30
शेतकऱ्यांना रानडुकरांची धास्ती अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या ...
शेतकऱ्यांना रानडुकरांची धास्ती
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांवर रानडुकरांनी हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर लहान मुले व महिला रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात जाण्यास धजावत नाहीत.
वाहतुकीस अडथळा
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजुने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यातच या रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
अपुरे कर्मचारी
अंबाजोगाई : अंबाजोगाई : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना पुरेशा सुविधा देण्यासाठी पालिकेकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. परिणामी शहरातील विविध भागात नागरी समस्या वाढत आहेत. तात्काळ उपाय करण्याची मागणी नागरिकांनी केली.
मंडी बाजार परिसरात अस्वच्छता
अंबाजोगाई : शहरातील मंडीबाजार परिसरात दररोज भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. व्यावसायिक लोक खराब भाजीपाला रस्त्यावर टाकत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे.