आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:24+5:302021-05-21T04:35:24+5:30
धारूर : तालुक्यातील रुईधारूर येथे अद्ययावत इमारत बांधून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, रुईधारूर ...
धारूर : तालुक्यातील रुईधारूर येथे अद्ययावत इमारत बांधून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, रुईधारूर गावापासून या आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या पुलाचे काम तत्काळ करण्याची मागणी रुईधारूरचे सरपंच बी. एन. गिरी व ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील रुईधारूर येथे या पंचक्रोशीतील सात-आठ गावे, वाड्या, तांडे येथील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी रुईधारूर गावापासून दीड किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत बांधून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. गावापासून आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता वाण नदीतून जातो. या रस्त्यावर पूल नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पावसाळ्यात नागरिकांना असुविधा होणार आहे. या पुलाचे काम यापूर्वी मंजूर झाले होते. त्याच्या कामाची प्रक्रिया झाली होती. मात्र, प्रत्यक्ष पुलाचे काम रखडल्याने पाऊस पडला की आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता बंद होतो. त्यामुळे रूईधारूर येथील वाण नदीवर पूल बांधण्याचे काम तत्काळ हाती घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
===Photopath===
200521\anil mhajan_img-20210509-wa0087_14.jpg