लोखंडी सावरगाव ते माळेगाव रस्त्याचे काम करण्याची मागणी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:44 AM2021-02-27T04:44:43+5:302021-02-27T04:44:43+5:30

निवेदनात नमूद केले आहे की २०१४ ते २०१९ च्या दरम्यान धायगुडा पिंपळा ते चुंबळी फाटा हा राज्यमार्ग मंजूर ...

Demand for construction of Lokhandi Savargaon to Malegaon road - A | लोखंडी सावरगाव ते माळेगाव रस्त्याचे काम करण्याची मागणी - A

लोखंडी सावरगाव ते माळेगाव रस्त्याचे काम करण्याची मागणी - A

Next

निवेदनात नमूद केले आहे की २०१४ ते २०१९ च्या दरम्यान धायगुडा पिंपळा ते चुंबळी फाटा हा राज्यमार्ग मंजूर करून काम पूर्ण झाले.

बीड जिल्ह्यातून श्री गजानन महाराज यांची शेगाव ते पंढरपूर ही पालखी लोखंडी सावरगाव ते माळेगाव याच मार्गाने जाते. याच मार्गावर प्रभू श्रीरामाचे मंदिर युसूफ वडगाव येथे आहे. तसेच या मार्गावर संत तुकाराम महाराज यांचे मंदिर व अनेक संत व महंतांच्या पवित्र समाधी आहेत. लोखंडी सावरगाव ते माळेगाव दरम्यान ३० ते ३५ गावे या रस्त्यास जोडलेली आहेत. लोखंडी सावरगाव ते माळेगाव या रस्त्याचे काम नव्याने करण्यात आल्यास या गावाचा दळणवळणचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे लोखंडी सावरगाव ते माळेगाव हा मार्ग नव्याने मंजूर करून या भागातील दळणवळण सुलभ व्हावे व या भागातील गावाचा विकास करण्यासाठी केज मतदारसंघातील लोखंडी सावरगाव ते माळेगाव रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर, पंचायत समिती सभापती विष्णू घुले, भारतीय जनता पक्षाचे सदस्य हनुमंत साने उपस्थित होते

Web Title: Demand for construction of Lokhandi Savargaon to Malegaon road - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.