दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:18+5:302021-01-16T04:38:18+5:30
बँकेत ग्राहकांची गर्दी अंबाजोगाई : शहरात बँकेची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, पतसंस्था, मल्टिस्टेट, या सर्वच ...
बँकेत ग्राहकांची गर्दी
अंबाजोगाई : शहरात बँकेची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, पतसंस्था, मल्टिस्टेट, या सर्वच ठिकाणी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशी स्थिती असतानाही मास्कचा वापर न करणे. सामाजिक अंतर न पाळणे, या नियमांचे उल्लंघन होत आहे.
झाडांचे संगोपन करा
नेकनूर : येथील बाजारतळावर काही दिवसांपूर्वी सावलीसाठी झाडे लावण्यात आली आहेत. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे झाडेदेखील जोमात आलेली आहेत, मात्र काही विक्षिप्त लोकांकडून ती झाडे तोडली जात आहेत. झाडांपासून बाजारावर सावली तयार होईल, त्यामुळे संगोपनाचे आवाहन केले आहे.
ग्रामीण भागातील बसेस सुरू कराव्यात
आष्टी : तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना बाजारपेठेच्या ठिकाणी येण्यासाठी बसेस उपलब्ध नाहीत. सध्या खासगी वाहनेही कमी प्रमाणात जातात. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर तासनातास बसावे लागत आहे. विविध खेड्यापाड्यातून कोणत्याही गाडीला हात करून ताटकळत उभे राहावे लागत आहे. खेड्यापाड्यातील लोकाची परिस्थिती पाहता प्रशासनाने बससेवा सुरू करून प्रवाशांचे हाल थांबावे, अशी मागणी आहे.