चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:43+5:302021-02-16T04:34:43+5:30
धूर फवारणी करावी डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्हीसह परिसरातील गावांमध्ये सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. तसेच अस्वच्छताही दिसून ...
धूर फवारणी करावी
डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्हीसह परिसरातील गावांमध्ये सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. तसेच अस्वच्छताही दिसून येते. त्यामुळे ग्रामपंचायतने धूर फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत
आहेत.
मुख्य रस्त्यांवर अस्वच्छता
बीड : वडवणी शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने ते सुंदर बनले आहेत. परंतु या दुभाजकाशेजारी घाण झाल्याने हा परिसर अस्वच्छ दिसू लागला आहे. त्यामुळे नगर पंचायतने दुभाजकाच्या दोन्ही बाजूंची स्वच्छता करावी, अशी मागणी वाहनधारकांसह पादचाऱ्यांमधून होत आहे.
दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर
बीड : शहरातील मुख्य बाजारपेठेसह भाजीमंडईत सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. बीड नगरपालिकेचे पथक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. लॉकडाऊन लागल्यापासून शहरात एकही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात आहे. यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
बँकेत ग्राहकांची गर्दी
परळी : येथील एसबीआय बँकेच्या शाखेत ग्राहकांची गर्दी वाढली असून, कोरोना पार्श्वभूमीवर कसलीही काळजी घेतली जात नसल्याची तक्रार सुजाण नागरिकांतून केली जात आहे. बँक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणीही केली जात आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
परळी : शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील राणी लक्ष्मीबाई टाॅवर ते उपजिल्हा रुग्णालय दरम्यानच्या प्रत्येक दुकानदारास डासांच्या प्रादुर्भावाचा त्रास होत आहे. परिसरात डासप्रतिबंधक फवारणीची मागणी नागरिकांमधून केली जात
आहे.