आसोला येथील त्रिवेणी संगमाचा विकास करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:31 AM2021-03-28T04:31:42+5:302021-03-28T04:31:42+5:30
धारुर तालुक्यातील आसोला येथील श्री विठ्ठल मंदिर हे पुरातन मंदिर असून येथे या पंचक्रोशीतील भाविक दरवर्षी विविध विधीला व ...
धारुर तालुक्यातील आसोला येथील श्री विठ्ठल मंदिर हे पुरातन मंदिर असून येथे या पंचक्रोशीतील भाविक दरवर्षी विविध विधीला व दर्शनाला मोठ्या उत्साहाने येतात. या ठिकाणी संत तुकाराम बीजेला उत्सव असताे. या मंदिराच्या बाजूलाच नदीजवळ कोळपिंपरी व आसोला या भागातून येणारे दोन मोठे ओढे व वाण नदी यांचा संगम आहे. त्रिवेणी संगम असल्याने येथे विविध धार्मिक विधी करण्यासाठी येणाऱ्या या परिसरातील दहा ते पंधरा गावातील लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या संगमाचा व विठ्ठल मंदिर परिसराचा विकास शासनाने करावा अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे. या संगमाचे खोलीकरण करून समोरील बंधाऱ्याची ही दुरुस्ती करावी अशी मागणी ॲड. संजय चोले यांनी केली आहे
===Photopath===
270321\img_20210317_101801_14.jpg