शैक्षणिक कर्जातून सूट देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:49+5:302021-02-12T04:31:49+5:30
खाद्यतेल वाढल्याने सामान्य ग्राहक त्रस्त अंबाजोगाई : खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तसेच किराणा सामानात इतरही विविध साहित्याचे ...
खाद्यतेल वाढल्याने सामान्य ग्राहक त्रस्त
अंबाजोगाई : खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तसेच किराणा सामानात इतरही विविध साहित्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे. सूर्यफूल, सोयाबीन तेलाचे भाव अचानक वाढले आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : शहरातील योगेश्वरी नगरी ते वाघाळा रस्ता या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. या मुख्य रस्त्यावर अनेक वसाहती आहेत. या वसाहतीतील रहिवाशांना या रस्त्याने जाता-येताना मोठा त्रास सहन करावा लागतो. मोठमोठ्या खड्ड्यांत दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडतात. लहान-मोठे अपघात या रस्त्यावर सातत्याने घडत आहेत, अशी स्थिती असूनही शासनाच्यावतीने या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्यालगत काटेरी झुडपे वाढली
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात असणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. यावर्षी मोठा पाऊस झाल्याने गवत व झुडपात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झुडपांमुळे वाहनधारक त्रस्त होत आहेत.