ऑक्सिजन प्लांटसाठी एक्स्प्रेस फिडरची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:18+5:302021-05-20T04:36:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटसाठी व कोविड सेंटरचा वीज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटसाठी व कोविड सेंटरचा वीज पुरवठा अखंडित राहावा, यासाठी स्वतंत्र एक्स्प्रेस फिडर उभारावे, या मागणीसाठी कोरोना रुग्ण समितीच्या वतीने बुधवारी वीज वितरणचे बीडचे अधीक्षक अभियंता बीड यांना निवेदन देण्यात आले.
पालकमंत्री धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त केंद्रेकर, जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. उपकेंद्र ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत नवीन स्वतंत्र लाईनद्वारे एक्स्प्रेस फीडर बसविण्यात यावे. अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र तीन लाईनमनची नियुक्ती कोरोना सेंटरवर करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. या कामासाठी प्रथम प्राधान्याने पूर्तता करीत आहे. तीन लाईनमन नियुक्त केल्याचे उपकार्यकारी अभियंता शिवलकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी समितीचे सदस्य ॲड. सुभाष निकम, महेश दाभाडे, कडुदास कांबळे, प्रा. राजेंद्र बरकसे, बाळासाहेब सानप, प्रशांत गोलेच्छा, रंजित सराटे, दादासाहेब घोडके, अण्णासाहेब राठोड, धर्मराज आहेर, सचिन खापे, गायकवाड, अक्षय पवार, संदीप मडके उपस्थित होते.
===Photopath===
190521\img-20210519-wa0205_14.jpg
===Caption===
स्वतंत्र एक्स्प्रेस फिडर उभारावे, या मागणीसाठी कोरोना रूग्ण समितीच्या वतीने बुधवारी वीज वितरणचे बीडचे अधिक्षक अभियंता बीड यांना निवेदन देण्यात आले.