परळीच्या राखमिश्रित विटांना चार राज्यांत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:40 AM2019-04-21T00:40:35+5:302019-04-21T00:43:18+5:30

येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.

The demand for four states of Parli's ashtrayed bricks | परळीच्या राखमिश्रित विटांना चार राज्यांत मागणी

परळीच्या राखमिश्रित विटांना चार राज्यांत मागणी

Next
ठळक मुद्देबाजारपेठेला आधार। औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोळसा जाळल्यानंतर तयार होणाऱ्या राखेतून मोठा रोजगार

संजय खाकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.
राखमिश्रित वीट बांधकामासाठी वजनांस हलकी व टिकण्यास मजबूत असल्याने परळीच्या विटास मोठी मागणी आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईपर्यंत ही वीट जाते. शिवाय इतर राज्यातही पुरवठा होतो. तालुक्यातील टोकवाडी, नागापूर, दाऊतपूर, चांदापूर रोडवर, सिरसाळा व इतर प्रत्येक वीटभट्टीवर किमान ५० वीट कामगारांना दुष्काळात आधार मिळाला आहे. तर तालुक्यात ३० हजार कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परिणामी आठवडी बाजाराच्या दिवशी दर सोमवारी हे वीटभट्टी कामगार कपडे, किराणा, भाजीपाला व खरेदीसाठी परळीच्या बाजारपेठेत गर्दी करतात. बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल होते. नोव्हेंबर ते मे दरम्यान विटेचे उत्पादन केले जाते. वीटभट्टीवर कामासाठी जिंतूर, परभणी, गंगाखेड, लातूर येथून कामगार आलेले आहेत. कामगारांना ३५० रु पये रोज हजेरी मिळते. ७० टक्के राख व ३० टक्के मातीचा वापर करून वीट बनविली जाते. राखेमुळे वीट दर्जेदार बनते. पाणी विकत घेतले जाते. वीजनिर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो. सध्या एक संच चालू आहे. दगडी कोळसा रेल्वेने कोळशाच्या खाणीतून परळीत येतो. कोळसा वीजनिर्मितीसाठी जाळल्यानंतरची राख दाऊतपूर व इंदपवाडी- टोकवाडी यथील राख तळ्यात पाण्यावाटे पाईपमधून सोडली जाते. ही राख ट्रॅक्टर, हायवा या वाहनातून वाहतूक केली जाते. ती राख वीटभट्टी चालक घेतात व सिमेंट उत्पादनासाठीही घेतली जाते. दहा वर्षांपासून परळी तालुक्यातील वीट उद्योग फोफावला आहे. यातून अनेकांचे जीवनमान उंचावले आहे तर कामगारांना रोजगार मिळत आहे. परळी शहर व परिसर राखेच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत.
अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर याच राखेने अनेकांचे म्हणजे वीट उद्योग चालकांचे व कामगारांचे जीवन फुलल्याचे टोकवाडीचे बालाजी मुंडे, दाऊतपूरचे श्रीकांत फड म्हणाले.
राखमिश्रित वीट टिकाऊ, मजबूत
औष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर राखतळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. या राखेपासून तयार झालेली वीट राखमिश्रित वीट टिकण्यास मजबूत असल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या चार राज्यात मागणी वाढली आहे. यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

Web Title: The demand for four states of Parli's ashtrayed bricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड