निराधारांना अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:33 AM2021-05-10T04:33:33+5:302021-05-10T04:33:33+5:30

अंबाजोगाई :कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात निराधारांना एक हजार रुपये मदत देण्याची ...

Demand for grants to the destitute | निराधारांना अनुदान देण्याची मागणी

निराधारांना अनुदान देण्याची मागणी

Next

अंबाजोगाई :कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात निराधारांना एक हजार रुपये मदत देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने निराधारांना तात्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी मानवलोक जनसहयोगचे शाम सरवदे यांनी केली आहे.

कोरोनाविषयक नियमांचे पालन करा

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर यांनी केले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला

अंबाजोगाई : लसीकरण असो अथवा कोरोना रुग्णांवरील उपचार या दोन्ही कामात आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. सध्या तालुक्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लस पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊ लागली आहे. याचा आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण वाढू लागला आहे.

कडक उन्हाळा, आरोग्य सांभाळा

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वाढत्या उन्हापासून नागरिकांनी आपले योग्य संरक्षण करावे, काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, कडक उन्हात बाहेर फिरणे टाळावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ .विवेक कुलकर्णी कुंभारीकर यांनी केले आहे.

प्लाझ्माबाबत वाढतेय जनजागृती

अंबाजोगाई : कोरोनाबधित रुग्णाला प्लाझ्मा दिल्यानंतर तो रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझ्माबाबत जनजागृती सुरू आहे. याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांना प्लाझ्मा दिलासादायक ठरू शकतो. यासाठी ज्यांना कोरोना होऊन गेला, अशा व्यक्तींनी प्लाझा देण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे विभागीय समन्वयक संतोष कुंकुलोळ यांनी केले आहे.

वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवा

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात सध्या विजेच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. मांजरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सध्या वीज उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची गरज असून पाण्याची उपलब्धता असल्याने पिकांना पाणी देता येईल. त्यामुळे क्षमता वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: Demand for grants to the destitute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.