दुष्काळी परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:28 AM2018-11-07T00:28:38+5:302018-11-07T00:29:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीसंदर्भात जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिका-यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीसंदर्भात जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकाºयांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर करण्याची केवळ घोषणा केली आहे मात्र प्रत्यक्षात बीड जिल्ह्यात दुष्काळ आणि टंचाई बाबत कोणत्याही उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नाहीत. घोषणा नकोत तर कार्यवाही करा, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी तातडीची उपाययोजना करा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळुंके, सरचिटणीस अमरसिंह पंडित, अॅड. उषा दराडे, संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
नेहमीप्रमाणे या सरकारने दुष्काळाबाबत सुध्दा शेतकºयांची आणि दुष्काळग्रस्त जनतेची फसवणूक केली आहे. गंभीर दुष्काळ जाहिर केल्याची केवळ पोकळ घोषणा केली, मात्र प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना दिल्याच नाहीत, त्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीबाबत कोणतीही प्रत्यक्ष उपाययोजना सुरु झाली नाही त्याचा जाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाला विचारण्यासाठी हे निवेदन देण्यात आले असून कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. पंडित यांनी यावेळी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळुंके, अॅड.उषाताई दराडे, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, माजी आ.पृथ्वीराज साठे, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, माजी आ.सय्यद सलीम, अॅड.डी.बी. बागल, युवकचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह सोळुंके, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, मनोहर डाके, गंगाधर घुमरे, अमर ढोणे, भाऊसाहेब डावकर, रमेश चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना या शिष्टमंडळाने लेखी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. शासनाकडून दुष्काळाची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष कार्यवाहीच्या सूचना अद्याप प्राप्त नाहीत, आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचिवल्या जातील असे आश्वासन अपर जिल्हाधिकाºयांनी दिले.
विविध मागण्या : चारा डेपो सुरू करा; माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडा
टँकर मंजुरीचे अधिकार तहसिलदार आणि गटविकास अधिकाºयांना द्यावेत, गोदावरी नदीवरील बॅरेज व बंधाºयांमध्ये पाणी सोडण्यात यावे, जिल्हाभरात जनावरांसाठी छावण्या आणि चारा डेपो सुरु करावेत,
मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी म.ग्रा.रो.ह.यो. ची कामे तात्काळ सुरु करावीत, बोंडअळीचे अनुदान आण िपिक विमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वाटप करावी, नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रु पये मदत करावी,
फळबागा आणि ऊस शेतीला हेक्टरी १ लाख रु पये मदत करावी, जायकवाडी धरणातून ३ टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडण्यात यावे, कृषीपंपाचे विज बिल माफ करावे,
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परिक्षा शुल्क माफ करावे यांसह विविध मागण्यांचे लेखी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शासनाला देण्यात आले.