घाटनांदूर येथे ५० बेडचे कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:38+5:302021-04-13T04:31:38+5:30
अंबाजोगाई व ग्रामीण भागामध्ये कोविड रुग्णांची रोजची सख्या ही शंभरच्या पुढे आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय ...
अंबाजोगाई व ग्रामीण भागामध्ये कोविड रुग्णांची रोजची सख्या ही शंभरच्या पुढे आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात व लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये बेड सद्यस्थितीत कमी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटनांदूर, उजनी, धर्मापुरी व पट्टीवडगाव या ग्रामीण व मोठी लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात किमान ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याची गरज असल्याचे देशमुख म्हणाले.
वास्तविक पाहता धर्मापुरी भागातील रुग्णांची कोविड चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे. रुग्ण संख्येचा आकडा फुगत असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड चाचणी गरजेची असून, त्या त्या भागात नेमके किती रूग्ण आहेत, याची निश्चित आकडेवारी समोर येईल. वाढीव रुग्णसंख्या लक्षात घेता ५० खाटांचे कोविड सेंटर मंजूर करून तत्काळ याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.