सरपंचांचे लसीकरण तातडीने करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:15+5:302021-05-21T04:35:15+5:30
कोरोना हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. गेल्या दीड वर्षपासून कोरोना संकट काळात ग्रामीण भागात सरपंच प्रत्यक्ष फिल्डवर, ...
कोरोना हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. गेल्या दीड वर्षपासून कोरोना संकट काळात ग्रामीण भागात सरपंच प्रत्यक्ष फिल्डवर, गावात सुविधा उपलब्ध करून देतात, रग्णालय परिसरामध्ये जाऊन रुग्णांना सेवा देण्याच्या कार्य करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासंदर्भात ग्रामीण भागातील भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणात फ्रंटलाइन वर्कर म्हणून प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. सध्या आरोग्य सेवक फ्रंटलाइन वर्करसह ४५ वर्षेवरील नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये समाजातील ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक असलेल्या सरपंच लसीकरणासंदर्भात लवकरात लवकर विचार करावा, अशी मागणी तिडके यांनी केली आहे.