घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:01+5:302021-09-09T04:41:01+5:30
------------------------- राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ अंबाजोगाई : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग अंबाजोगाई शहरातून गेला आहे. जवळपास चार ...
-------------------------
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
अंबाजोगाई : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग अंबाजोगाई शहरातून गेला आहे. जवळपास चार कि. मी. पर्यंतच्या महामार्गावर साखर कारखाना परिसरात उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून हजारो वाहनांची वर्दळ असते.
-------------------------
ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना
अंबाजोगाई : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था झाली होती. रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी आहे.
-------------------------
रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा वनविभागाला रानडुकरांच्या उपद्रवाची माहिती दिली. मात्र, वनविभागाच्या उदासीन कारभारामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
-------------------------
स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण
अंबाजोगाई : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यासाठी मोहीम आखण्याची गरज आहे.