रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:23+5:302021-01-16T04:38:23+5:30
कडा : शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ...
कडा : शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
कर्णकर्कश हॉर्नचा सर्वसामान्यांना त्रास
माजलगाव : येथील तालुका रुग्णालय परिसरात वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने रुग्णांसह सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेकवेळा वाहनधारक नागरिकांच्या जवळ येऊन मोठे हॉर्न वाजवत असल्याने नागरिक मोठ्या आवाजाने दचकत आहेत. या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कचऱ्यामुळे दुर्गंधी, प्रवाशांना त्रास
पाटोदा : शहरातील बसस्थानकासभोवती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. दुर्गंधीचा त्रास येथील नागरिकांना करावा लागतो. परिणामी डासांचे प्रमाण वाढत आहे. प्रवाशांसोबतच परिसरात राहणाऱ्या जनतेचेही आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेची मागणी जोर धरू लागली आहे.
काटेरी झाडांची अडचण
वडवणी : शहरापासून कवडगाव देवडीसह ग्रामीण भागातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी वेल, झाडे वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील काटेरी झाडे तोडण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
रोहित्रांची निगा ठेवावी
बीड : शहरात अनेक ठिकाणी रोहित्रांचे दरवाजे उघडेच दिसून येत आहे. कुठे रोहित्राचे दरवाजे गायब आहेत, तर कुठे रोहित्रावर वेल, झाडांचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. रोहित्रांची निगा चांगली ठेवण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
दुचाकी चोऱ्या वाढल्या
बीड : शहरातील अनेक शासकीय कार्यालय परिसरात दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाहन परत मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे काही वाहनधारक ठाण्यात तक्रार देणेही टाळत आहेत. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.