लातूर-आवसगाव बससेवेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:28 AM2020-12-24T04:28:53+5:302020-12-24T04:28:53+5:30
आपेगावचे सरपंच निलेश शिंदे यांनी लातूर आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात सर्वत्र ...
आपेगावचे सरपंच निलेश शिंदे यांनी लातूर आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात सर्वत्र लॉकडाऊन होते. त्यामुळे दहा महिने लातूर ते आवसगाव ही बससेवा बंद होती. मात्र आता सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले असून अनेक बससेवा सुरू होऊन दोन महिने झाली आहेत. काही दिवसा पूर्वीच शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले असून ही बससेवा बंद असल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. पण वेळेवर शाळा कॉलेजला जाता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही बससेवा लातूर - बीड -उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यांसाठी सोयीची असल्याने तातडीने सुरू करावी अशी मागणीही सरपंच शिंदे यांनी केली आहे.