फेसबुक हॅक करून जवळच्या मित्रांकडे पैशाची होते मागणी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:03+5:302021-06-06T04:25:03+5:30

बीड : ऑनलाईन फसवणुकीचे एकापेक्षा एक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. फसवणुकीसाठी नवनवीन शक्कल गुन्हेगारांकडून वापरली जात आहे. ...

Demand for money from close friends by hacking Facebook - A | फेसबुक हॅक करून जवळच्या मित्रांकडे पैशाची होते मागणी - A

फेसबुक हॅक करून जवळच्या मित्रांकडे पैशाची होते मागणी - A

googlenewsNext

बीड : ऑनलाईन फसवणुकीचे एकापेक्षा एक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. फसवणुकीसाठी नवनवीन शक्कल गुन्हेगारांकडून वापरली जात आहे. सीम बंद पडणार आहे, एटीएम कार्ड ब्लॉक होणार आहे असे सांगून ठगांकडून बँक खात्याची माहिती घेतली जात होती. नंतर संपूर्ण पैसा परस्पर काढला जात होता. आता मात्र वेगळे कारण सांगितले जात आहे. ‘आर्थिक अडचणीत आहे, रुग्णालयात भरती असून उपचारासाठी पैसे हवे’, अशी गळ फेसबुक मेसेंजरवर घातली जाते व फसवणूक केली जात आहे.

ऑनलाईन फसवणुकीमध्ये संबंधितांना सुटलेली लालच त्याचा घात करते. अनेक प्रकारचे ॲपसुद्धा धोकादायक आहेत. बऱ्याचदा बँकेचा किंवा विमा कंपनीचा तसेच गुगल पे, फोन पे तसेच इतर कुठल्या संस्थेचा कस्टमर केअरचा नंबर गुगलवर सर्च केला जातो. या ठिकाणी अनेकांचे खोटे नंबर गुगलवर येतात. त्यांना फोन केल्यानंतर त्यांच्याशी संभाषण होते. यावेळी ते जे सांगतील तसे केल्यानंतर आर्थिक फसवणूक होते. अशा प्रकारे अनेकांना फोन करून लाखो रुपयांना गंडा घातला जातो. याप्रकरणी पोलिसात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बँकेतून परस्पर रक्कम काढून घेतल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. दरम्यान, अशी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान

मोबाईलवर ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अन्यथा तुमची या ॲपद्वारे देखील फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे.

असा कॉल वा मेसेज आल्यास रहावे सावधान

१ मोबाईलचे सीम बंद पडणार आहे. ते अपडेट करायचे आहे. असे सांगून तुमची माहिती विचारली जाते. नंतर मेसेजद्वारे आलेला ओटीपी मागितला जातो. यातूनही फसवणूक होऊन बँक खात्यातील रोख रक्कम काढण्यात येते.

२ एटीएम बंद पडू शकते. तुम्ही बँक खात्यासंदर्भातील माहिती कोणालाही सांगू नये, आधार बँक खात्याशी लिंक करायचे आहे असे सांगून देखील रक्कम काढून घेतल्याचे प्रकार घडलेले आहेत.

३ अतिशय सहज पद्धतीने हवे तितके कर्ज मिळवा, असे आमिष दाखवून संपूर्ण बँक डिटेल्स घेते जातात. कर्जासाठी गॅरंटरची गरज लागत नाही हे पाहून अनेकजन आमिषाला बळी पडतात आणि फसवणूक होते.

अशी घ्या काळजी

अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फोन कॉलवर कुठलीही माहिती देऊ नका. कोणतीही बँकिंग प्रक्रिया ही नियमाच्या अधीन राहून केली जाते. त्यामुळे सहज कर्ज मिळत नाही. स्वस्तात वस्तू खरेदीच्यासुद्धा प्रलोभनाला बळी पडू नये.

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत आहे. असे मेसेज आल्यावर संबंधितांसोबत यासंदर्भात चर्चा केली तर, फसवणूक होणार नाही. तसेच नागरिकांनी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहावे.

- आर. एस. गायकवाड, सायबर सेल प्रमुख, बीड

.

ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी २०२१ - ८५

फेसबुक बनावट आयडी बनविल्याच्या तक्रारी - २३

Web Title: Demand for money from close friends by hacking Facebook - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.