कत्तलखाना धारूरबाहेर हलविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:22+5:302021-09-17T04:40:22+5:30

धारूर : शहरातील लोणार गल्ली भागात सर्रासपणे जनावरांचा कत्तलखाना सुरू असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी सुटल्याने या भागातील ...

Demand to move the slaughterhouse out of Dharur | कत्तलखाना धारूरबाहेर हलविण्याची मागणी

कत्तलखाना धारूरबाहेर हलविण्याची मागणी

googlenewsNext

धारूर : शहरातील लोणार गल्ली भागात सर्रासपणे जनावरांचा कत्तलखाना सुरू असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी सुटल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील कत्तलखाना तत्काळ बंद करून नियोजित ठिकाणी तत्काळ हलविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धारूर शहरात नगर परिषदेने कत्तलखान्यासाठी नियोजित जागा दिलेली असताना लोणार गल्लीत शहरातील भरवस्तीत बेकायदेशीर कत्तलखाना सुरू आहे. यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून तत्काळ येथील कत्तलखाना बंद करून नियोजित ठिकाणी तो हलविण्याची मागणी तालुकाप्रमुख नारायण कुरुंद, तालुका संघटक राजकुमार शेटे, उपतालुका प्रमुख बंडू बप्पा सावंत, तालुका समन्वयक चंद्रसेन तिडके, विद्यार्थी सेना तालुका गणेश पवार, उपशहरप्रमुख सुनील भांबरे, अविनाश काळेसह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Demand to move the slaughterhouse out of Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.