टोल प्लाझाचे नामकरण तांबव्याऐवजी धारूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:39 AM2021-09-24T04:39:33+5:302021-09-24T04:39:33+5:30

महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाअंतर्गत धारूर येथून खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर धारूर येथून ४ ते ५ कि.मी. अंतरावर धारूर ...

Demand for naming of toll plaza instead of copper | टोल प्लाझाचे नामकरण तांबव्याऐवजी धारूर करण्याची मागणी

टोल प्लाझाचे नामकरण तांबव्याऐवजी धारूर करण्याची मागणी

Next

महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाअंतर्गत धारूर येथून खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर धारूर येथून ४ ते ५ कि.मी. अंतरावर धारूर महसुली हद्दीमध्ये केजरोड येथे टोल प्लाझाचे तांबवा असे नामकरण केलेले आहे. प्रत्यक्षात पाहता हा टोल नाका हा किल्ले धारूर शहराच्या हद्दीमध्ये आहे व टोल नाक्यावर धारूर हे नाव असणे आवश्यक होते. परंतु तांबवा हे नाव टाकण्यात आलेले आहे. तांबवा हे गाव केज तालुक्यामध्ये आहे व टोलनाक्यापासून ६ कि.मी. अंतरावर आहे. हा टोल सुरू होण्यापूर्वी तांबव्याऐवजी धारूर नामकरण केल्यास धारूर हद्दीतील स्थानिकांना शासन नियमाप्रमाणे टोलमधून सवलत मिळेल. त्यामुळे मागणी शिनगारे यांनी केली आहे.

230921\img_20210923_145808.jpg

धारूर येथील टोल प्लाजा नावा तात्काळ बदला

Web Title: Demand for naming of toll plaza instead of copper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.