शिक्षकांच्या कोविड कामांची सेवा पुस्तिकेत नोंद घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:13+5:302021-03-04T05:02:13+5:30
: कोविड - १९ च्या महामारीमध्ये शासनाच्या आदेशानुसार सर्व शिक्षकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम केले. त्यामुळे ...
: कोविड - १९ च्या महामारीमध्ये शासनाच्या आदेशानुसार सर्व शिक्षकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम केले. त्यामुळे या शिक्षकांना तसे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी शिक्षक नेते रमेश फपाळ यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे केली आहे.
कोविडच्या काळात काम करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची नोंद सेवा पुस्तिकेत घेण्यात यावी, तसे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात यावेत, कोविडमधील सुट्टी १ मे ते १५ जून या कालावधीतील रजा अर्जित रजा म्हणून मान्य करावी, ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत काम केलेल्या शिक्षकांचे मानधन तत्काळ द्यावे, बी. एल. ओ. चे प्रलंबित देयके तत्काळ अदा करावेत यासह कोरोना काळात काम केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे अशा मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल आणि मागण्या तत्काळ मान्य करण्याचे आश्वासन तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिले आहे. निवेदनावर शिक्षक नेते रमेश फपाळ, उत्तम पवार, संदीपान वानखेडे, गणेश डिसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.