कुंडलिका उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:30 AM2021-01-21T04:30:28+5:302021-01-21T04:30:28+5:30
सिंचनाचा लाभ द्या, नसता आंदोलनाचा इशारा धारूर : कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव नित्रुड, लोणवळ तलावातून जलवाहिनी प्रवाहात ...
सिंचनाचा लाभ द्या, नसता आंदोलनाचा इशारा
धारूर : कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव नित्रुड, लोणवळ तलावातून जलवाहिनी प्रवाहात काढून या गावातील जमिनीसाठी सिंचनाचा लाभ पूर्ववत तत्काळ द्यावा, नसता २५ जानेवारीपासून तेलगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषणाचा इशारा विठ्ठल लगड व ५० शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव, लोणवळ, नित्रुड या गावच्या हेडपासून टेलपर्यंत जमिनी सिंचनाखाली येतात. मात्र, या शेतकऱ्यांना सात वर्षांपासून पाण्याचा लाभ देणे बंद असल्याने पिके व शेती अडचणीत आली आहे. कॅनलवर अनधिकृत विद्युत मोटारी मोठ्या प्रमाणात असल्याने या शेतकऱ्यांना कॅनलच्या पाण्याचा फायदा होत नाही. या शेतकऱ्यांच्या जमिनी कंमाडमध्ये येत असल्याने जमिनीचा खरेदी - विक्रीचा व्यवहार करताना आर्थिक भुर्दंड या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. याबाबत यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या जमिनी ओलितापासून व कॅनलच्या पाण्यापासून वंचित राहात आहेत. पाण्याचा लाभ तत्काळ द्यावा, नसता २५ जानेवारीपासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा विठ्ठल लगड, विष्णू लगड, नवनाथ चव्हाण, धोंडिराम चव्हाण, संतोष लगड यांच्यासह पन्नास शेतकऱ्यांनी दिला आहे.