रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:02+5:302021-04-18T04:33:02+5:30

बीड : सध्या शहरात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. लॉकडाऊन व बेरोजगारीमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनत आहे. रेमडेसिविर ...

Demand for remediation | रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याची मागणी

रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याची मागणी

Next

बीड : सध्या शहरात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. लॉकडाऊन व बेरोजगारीमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता असल्यामुळे रुग्णांना उपचार कमी पडत आहेत. काही ठिकाणी हेच इंजेक्शन पाच ते सात हजार रुपयांना विकले जात आहे. इतके पैसे लोकांनी आणायचे कोठून म्हणून हे इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नगरसेवक रंजित बनसोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

आर्थिक पॅकेजसाठी शासन विचार करणार का?

बीड : लॉकडाऊनमुळे व्यापार, उद्योग कोलमडून जात आहेत. समाजातील सर्व छोटे घटक, हातावर पोट असणारे लहानमोठे व्यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार, एसबीसी, भटक्या विमुक्त या समाजातील अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. या सर्वांसाठी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासन आर्थिक पॅकेज जाहीर करणार का? असा सवाल प्रसिद्धी पत्रकाद्वारे बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर यांनी केला आहे. गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार, एसबीसी, भटक्या विमुक्त समाजातील उद्योग-धंद्यांचे प्रचंड हाल झाले असून, शासनाने तत्काळ या वर्गासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीदेखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

बीड तालुका कार्यकारिणी निवड

बीड : येथील सेवानिवृत्त बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करून नियुक्तिपत्र देण्यात आले. अध्यक्षपदी काशीनाथ शंकरराव वाघमारे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. चंद्रवंदन भिवाजी जाधव, सचिव - दादाराव आप्पाजी गायकवाड़, सहसचिव- लिंबाजी भगवानराव जाधव, कोषाध्यक्ष - शिवाजी भागवत मस्के अशी कार्यकारिणी जाहीर करण्यता आली आहे. या प्रसंगी कॅप्टन राजाभाऊ आठवले, इंजि. वसंतराव तरकसे, जी. एम. भोले, एस. टी. विद्यागर, सहकोषाध्यक्ष शंकर वाव्हळकर, संघटक सुमन गायकवाड, ए. एस. शिनगारे, आशा विद्यागर, आदित्य साळवे, डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एम. भोले यांनी केले. वसंतराव तरकसे यांनी आभार मानले.

Web Title: Demand for remediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.