विंधन विहिरी दुरुस्त करण्याची मागणी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:57+5:302021-03-04T05:02:57+5:30
राजमुद्रा सामाजिक संघटना यांच्या वतीने नगरपरिषद अंतर्गत धारूर शहरात असलेल्या विंधन विहिरी तत्काळ दुरुस्ती करून मोटारी बसविण्यात याव्यात व ...
राजमुद्रा सामाजिक संघटना यांच्या वतीने नगरपरिषद अंतर्गत धारूर शहरात असलेल्या विंधन विहिरी तत्काळ दुरुस्ती करून मोटारी बसविण्यात याव्यात व तत्काळ शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरवासीयांची मागील बऱ्याच दिवसापासून पाण्यासाठी भटकंती चालू आहे. पाणी नसल्यामुळे अनेक लहान- मोठ्या स्त्री-पुरुषांना पाण्यासाठी त्रास करावा लागत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे लोकांना रोजगार उपलब्ध नाही व दररोज पाणी विकत घेणे शक्य होईनासे झाले आहे. त्यामुळे अनेक गोरगरीब लोकांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड चालू आहे. तसेच शहरात सार्वजनिक विंधन विहिरी किती आहेत?, पैकी किती दुरुस्त व किती नादुरुस्त आहेत, तसेच प्रत्येक विंधन विहिरीची मोटार उपलब्ध आहेत? का? याची सुद्धा चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राजमुद्रा सामाजिक संघटना ही शहरातील विंधन विहिरी दुरुस्ती करण्यास तयार आहे, संघटनेस परवानगी देण्यात यावी , अशी मागणी सुरेश शेळके, बबलू सावंत, उमेश पवार, सुनील गैबि, नाथा चव्हाण, सचिन शिरसाट, नाथा ढगे, महेश गवळी, पवन धोत्रे, रोहन गायकवाड, माउली औताडे, राम काळे, ज्ञानेश्वर कदम, अक्षय मुळे, विकी चव्हाण यांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.