पांदण रस्ता दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:35+5:302021-04-20T04:35:35+5:30
स्थानकात अस्वच्छता धारूर : येथील बस स्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बस स्थानकाच्या परिसरात ...
स्थानकात अस्वच्छता
धारूर : येथील बस स्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बस स्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते, तसेच मोकाट जनावरेही फिरतात.
भाजीपाला स्वस्त
अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरात दोन आठवड्यांपासून पत्ता कोबी, फूलकोबी, वांगी, टोमॅटो, पालक, मेथी, सिमला मिरची, लिंबू, कोथिंबीर अशा विविध भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक असून, लॉकडाऊनमुळे ग्राहकी नसल्याने विक्रेत्यांना भाज्या स्वस्त विकाव्या लागत आहेत.
स्वच्छतेची गरज
बीड : गावोगावी स्वच्छता अभियान जोमाने राबविले जात होते. त्यामुळे गावची स्वच्छताही कायम राहत होती. मात्र, कोरोनाचे संकट उद्भवल्यापासून स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष सुरू झाले आहे. याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. पुन्हा लोकसहभागातून गावोगावी स्वच्छता अभियानाची मागणी आहे.