पिंपळा-लोणी रस्ता दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:36+5:302021-07-09T04:22:36+5:30
पावसाने शेतकऱ्यांना दिलासा धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतात पाणी साचले ...
पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतात पाणी साचले होते. या पावसाने सुकलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, परिसरातील गावात मात्र अद्याप पाऊस नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
...
दादेगाव-घाटापिंप्री रस्त्यावर खड्डे
आष्टी : तालुक्यातील दादेगाव ते घाटापिंपरी रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांत जागोजागी खड्डे पडले आहे. याचा वाहनचालकांना त्रास होत आहे. तरी हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
....
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
कडा : आष्टी तालुक्यात जुलै महिना उलटला तरी निम्म्याहून अधिक तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पेरणीनंतर पाऊस न झाल्याने खरिपाची पिके सुकून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांंना दुबार पेरणी करावी लागणार आहे. यामुळे पीकविमा भरण्यासाठी सातबारा, आठ ‘अ’ जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.