राजेवाडीत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन;बंधार्याचे उच्चपातळीत रुपांतर करण्याची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:28 PM2018-01-29T15:28:37+5:302018-01-29T15:33:11+5:30
राजेवाडी येथील बंधा-याचे उच्चपातळी बंधा-यात रूपांतर करावे या मागणीसाठी आज दुपारी शिवसेनेतर्फे बंधाऱ्यावर बसून आंदोलन करण्यात आले.
माजलगांव (बीड ) : राजेवाडी येथील बंधा-याचे उच्चपातळी बंधा-यात रूपांतर करावे या मागणीसाठी आज दुपारी शिवसेनेतर्फे बंधाऱ्यावर बसून आंदोलन करण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा डॉ. उध्दव नाईकनवरे यांनी दिला आहे.
तालुक्यातील राजेवाडी येथील बंधारा कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेला आहे. या बंधा-यातुन राजेवाडी, केंडेपिंप्री, नित्रुड, पुनंदगांव, धानोरा या गावांना पाणीपुरवठा होतो. मागील दहा ते पंधरा वर्षांपासुन या बंधा-याचे काम अपुर्ण आहे. बंधा-याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून सदर बंधा-यास पाणी अडविण्यास दरवाजे नाहीत, त्यामुळे बंधा-यात पाणीसाठा होत नाही. यामुळे याच्या प्रभावाखालील गाव शिवारातील हजारो एकर जमिनी ओलीताखाली येत नाहीत. यातूनच शेतक-यांचे व जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हाल होतात. त्यामुळे राजेवाडी येथील बंधा-यास तात्काळ दरवाजे बसवावेत व त्याचे उच्चपातळी बंधा-यात रूपांतर करावे अशी मागणी करत शिवसेनेन डॉ. उध्दव नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली बंधा-याच्या भिंतीवर बसुन आंदोलन करण्यात आले.
यासोबतच मागण्यांची पूर्तता न झाल्यास आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा डाॅ. उध्दव नाईकनवरे यांनी दिला आहे. लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी चव्हाण यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांच्यासोबत मंडळाधिकारी कोमटवार व तलाठी सुंकावार यांची उपस्थिती होती. यावेळी बंधाऱ्यावर माजलगांव, वडवणी व दिंद्रुड पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
आंदोलनास मानवी हक्क अभियानने पाठिंबा दिला आहे. यात मनोहर डाके, पापा सोळंके, अतुल उगले, ग्रा. प. सदस्य महेश थेटे, पांडूरंग गोजे, नामदेव सोजे, सरपंच साहेबराव आवाड, उपसरपंच रामेश्वर थेटे, अंगद मायकर, परमेश्वर थेटे, सुशिल धपाटे, नवनाथ शेळके, प्रकाश थेटे, किरण पाठक, राजाभाउ थेटे, दिपक महागोविंद, भगवान कुरे, माउली जाधव, विश्वांभर कुरे, आश्रूबा थेटे, भारत थेटे, बाबा थेटे, संतोष भोसले, माउली महागोविंद, पांडुरंग खांडवे, सुभाष खांडवे, अंगद खांडवे, अंगद पवार, वैजनाथ राठोड, अच्युत राठोड, महेश गोजे, भारत महागोविंद, संतोष थेटे, गुलाब खांडव, धर्मराज मुळे, पंडीत थेटे यांच्यासह या भागातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.