वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:28 AM2021-01-15T04:28:30+5:302021-01-15T04:28:30+5:30

माजलगाव येथील अतिक्रमण हटेना माजलगाव : शहरातील बसस्थानक तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या इमारतींना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला ...

Demand for smooth power supply | वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

Next

माजलगाव येथील अतिक्रमण हटेना

माजलगाव : शहरातील बसस्थानक तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या इमारतींना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्यावर हातगाड्यांची गर्दी असते. याबाबत येथील नागरिक तक्रारी करत आहेत.

वीज तारा लोंबकळल्या

गेवराई : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. वीज तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. दुरुस्तीची मागणी केली जात आहे. तरी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने धोका वाढत आहे.

दारू विक्री बंद करा

आष्टी : तालुक्यामध्ये ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे महिलांनी सांगितले.

रस्त्याची दुरवस्था जैसे थे

बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुरुस्तीची मागणी होत आहे.

आजार वाढले

गेवराई : शहरातील विविध भागात घाण साचली आहे. यामुळे विविध आजारांचा प्रसार वाढला असून खासगी व उपजिल्हा रुग्णालयात लोक उपचार घेत आहेत. न.प.ने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र अद्यापही याकडे पालिकेचे लक्ष नाही.

गतिरोधक बसवा

माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

बाजारतळाची दुरवस्था

बीड : तालुक्यातील चौसाळा येथील आठवडी बाजार भरणाऱ्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. बाजारतळाची दुरुस्ती करून सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Demand for smooth power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.