जनावरांना टॅग लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:00+5:302021-07-31T04:34:00+5:30
.... ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ...
....
ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची थातूरमातूर कामे केल्याने रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी पाटोदा येथील भाजपाचे कार्यकर्ते शिरीशकुमार मुकडे यांनी केली आहे.
.....
रिक्त पदे भरण्याची मागणी
अंबाजोगाई : विविध शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षात अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे अनुकंपाधारकांना अडचण होत आहे. त्यामुळे ही पदेही भरण्याची मागणी केदार दामोशन यांनी केली आहे.
.....
वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : चंद्रपूर मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल-डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रवासी भाड्यामध्ये ही वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भाववाढ कमी करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. अनंतराव जगतकर यांनी केली आहे.
....
खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : वीज वितरण कंपनीने ग्रामीण भागात विशेष लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काही गावात वीज दुरुस्तीचे कामे करण्यासाठी कर्मचारी नसल्याने अनेकवेळा ग्रामस्थांना तासन्तास वीज येण्याची वाट बघावी लागते. सध्या पावसाचे दिवस असल्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वीज सुरळीत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष लोमटे यांनी केली आहे.