कोरोना लॉकडाऊनचे नियम कडक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:04+5:302021-04-21T04:33:04+5:30

..... ‘व्यावसायिकांंनी कोरोना टेस्ट करावी’ कडा : जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोनासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी ...

Demand to tighten Corona lockdown rules | कोरोना लॉकडाऊनचे नियम कडक करण्याची मागणी

कोरोना लॉकडाऊनचे नियम कडक करण्याची मागणी

Next

.....

‘व्यावसायिकांंनी कोरोना टेस्ट करावी’

कडा : जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोनासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. फळ विक्रेते, किराणा दुकानदार, औषधी दुकानदार यांच्याकडे कोरोना टेस्ट केलेला रिपोर्ट असावा. तालुक्यातील बोटावर मोजण्या एवढ्या लोकांकडेच रिपोर्ट आहे. ज्यांनी कोरोना टेस्ट केलेली नाही, अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे यांनी केली आहे.

....

महिला कामगारांना आर्थिक मदत करण्याची मागणी

कडा : आष्टी, कडा शहरात मोठ्या प्रमाणावर घरकाम करणाऱ्या महिला आहेत. त्या आपली उपजीविका यावरच भागवतात. पण सध्या कोरोनाचे संकट असल्याने त्यांना घरकामासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवणे जिकिरीचे बनले आहे. याकडे लक्ष देऊन सरकारने, सेवाभावी संस्थांनी त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.

Web Title: Demand to tighten Corona lockdown rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.