ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:34+5:302020-12-31T04:32:34+5:30
माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणूनच दिंद्रुड सर्वश्रुत आहे. येथील पोलीस ठाण्याला पोलीस उपनिरीक्षक विजेंद्र नाचण यांना ...
माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणूनच दिंद्रुड सर्वश्रुत आहे. येथील पोलीस ठाण्याला पोलीस उपनिरीक्षक विजेंद्र नाचण यांना परत रुजू करण्याची मागणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंद्रुड ग्रामस्थांनी केली आहे.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्यातंर्गत दिंद्रुड, मोगरा, नित्रुड, चोपनवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होणार असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
कोरोनाच्या काळात दिंद्रुड पोलीस ठाण्यातंर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक विजेंद्र नाचन व पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड येथे नाचण यांची बदली करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता विजेंद्र नाचन यांना परत दिंद्रुड पोलीस स्टेशनला रुजू करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.