घरगुती सोयाबीन बियाणे वापराबाबत प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:34+5:302021-05-06T04:35:34+5:30
धारूर : तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना घरगुती सोयाबीन बियाणे वापर, उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया याची माहिती ...
धारूर : तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना घरगुती सोयाबीन बियाणे वापर, उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया याची माहिती प्रात्यक्षिक मोहीम राबवून देण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे, कृषी अधिकारी समाधान वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सोयाबीन हे पीक स्वपरागण सिंचित पीक असल्याने सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा बियाणे वापरल्यानंतर पुढील दोन ते तीन वर्षे यापासून मिळणारे बियाणे वापरता येते. शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. शेतकऱ्यांनी स्वतः जवळील किंवा बाजारातून बियाणे खरेदी केलेले असले तरी त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, याबाबत कृषी सहायक एस. एम. लामतुरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. सोयाबीन बियाणे पेरणी करण्यासाठी शक्यतो घरचे बियाणे वापरावे. बियाणे उगवण क्षमता तपासणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन बियाणे पेरणी करताना बीबीएफ म्हणजेच रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. ७० टक्के उगवण क्षमतेच्या पुढील बियाणे पेरणीसाठी वापरावे व कमी उगवण क्षमतेचे बियाणे पेरणीसाठी वापरू नये याबाबत कृषी सहायक आर. व्ही. राऊत, एस. एम. लामतुरे यांनी आवाहन केले. यावेळी विष्णू डापकर, चिरके, तुकाराम नरवाडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
050521\anil mhajan_img-20210505-wa0095_14.jpg