लोकतांत्रिक जनता दलाचे तहसीलसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:12+5:302021-07-13T04:08:12+5:30

माजलगाव : तालुक्यातील निराधार, शेतकरी, शेतमजुरांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम ...

Demonstrations of Loktantrik Janata Dal in front of tehsils | लोकतांत्रिक जनता दलाचे तहसीलसमोर निदर्शने

लोकतांत्रिक जनता दलाचे तहसीलसमोर निदर्शने

Next

माजलगाव : तालुक्यातील निराधार, शेतकरी, शेतमजुरांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांच्या नेतृत्वाखाली न्याय व हक्काच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ, अपंग अशा निराधार लाभधारकांना प्रतिमहा ५००० रुपये वेतन देण्यात यावे. जिल्हा मध्यवर्ती बँक व माजलगाव पोस्ट ऑफिसमधील लाभधारकांचे खाते तेथेच ठेवून नवीन खाते उघडण्यास तत्काळ आदेशित करावे, निराधार लाभधारकांना शासन जीआरप्रमाणे पिवळ्या शिधापत्रिका देण्यात याव्या. निराधार लाभधारकांना प्रतिमहा २५ किलो धान्य मोफत देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश असलेले निवेदन नायब तहसीलदार साबणे यांना देण्यात आले. आंदोलनात नागिरक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

..

Web Title: Demonstrations of Loktantrik Janata Dal in front of tehsils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.