परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:38+5:302021-04-06T04:32:38+5:30
कोपरा येथील निर्भया व तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात दाखल खोट्या केसेस तत्काळ रद्द कराव्यात, निर्भयावर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींना ...
कोपरा येथील निर्भया व तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात दाखल खोट्या केसेस तत्काळ रद्द कराव्यात, निर्भयावर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कडक शासन करावे, निर्भया व त्याच्या कुटुंबीयांना त्वरित संरक्षण द्यावे, शासनाने निर्भयाचे पुनर्वसन करावे अशा मागणीचे निवेदन यावेळी परळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांना मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आले. यावेळी कोपराप्रकरणी अन्यायाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांच्यासह ओम काळे, अरुण सपाटे, हनुमान सातपुते, भागवत साबळे, सौदागर शेळके, पृथ्वीराज देशमुख, निकेश पाटील, पवन माने, अभिषेक काळे, छत्रगुण साबळे, मुकेश साबळे, दत्ता रोडे, धोंडिबा साबळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
050421\img-20210405-wa0348_14.jpg