न.प.कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:53 PM2019-07-31T23:53:08+5:302019-07-31T23:53:52+5:30
२००५ नंतरच्या कर्मचा-यांची पेन्शन अंशदानाची रक्कम नगरपालिका हिश्यासह भरावी, कर्मचा-यांचे कर्जाचे व विम्याचे हप्ते वेळेवर भरावेत, या मागण्यांसाठी कर्मचा-यांनी ३१ जुलै रोजी दुपारी १ वाजता परळी नगर परिषद कार्यालयापुढे निदर्शने केली.
परळी : मे, जून व जुलै या तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात यावे, प्राव्हिडंट फंडाच्या स्लीप देण्यात याव्यात, पगाराच्या पे स्लीप देण्यात याव्यात, २००५ नंतरच्या कर्मचा-यांची पेन्शन अंशदानाची रक्कम नगरपालिका हिश्यासह भरावी, कर्मचा-यांचे कर्जाचे व विम्याचे हप्ते वेळेवर भरावेत, या मागण्यांसाठी कर्मचा-यांनी ३१ जुलै रोजी दुपारी १ वाजता परळी नगर परिषद कार्यालयापुढे निदर्शने केली.
२६ जुलै रोजी नगर परिषद कर्मचारी युनियनतर्फे निवेदन देऊन निदर्शनाची सूचना मुख्याधिका-यांना दिली होती. परंतु मुख्याधिका-यांनी संघटनेला चर्चेला सुध्दा बोलावले नाही व तीन महिने पगार न देण्याचे कारणही सांगितले नाही. पगार शासनाकडून आलेला आहे परंतु कर्मचा-यांना मिळाला नाही. निदर्शनाची सूचना देवूनही ३० जुलैपर्यंत पगार न झाल्यामुळे कर्मचा-यांनी नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, उपाध्यक्ष शंकर साळवे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेसमोर निदर्शने केली व कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. निदर्शने यशस्वी करण्यासाठी शंकर साळवे, विलास केदारे, राजाभाऊ जगताप, शरणम ताटे, व्ही.बी.दुबे, दशरथ जगतकर, सूर्यकांत डहाळे, किरण उपाडे, शेख अबुजर, राजाभाऊ जगतकर, सचिन हिके, एस.व्ही.घाटे, बांगर ताई, आशा रोडे, शिंदे, वाघमारे, बबीता डबडे, कांताबाई जगतकर, विशाल पाठक, सचिन देशमुख, सतीश भोसले, खाकरे, पी.के. कुलकर्णी, भिसे, पवार, राज गायकवाड, अशोक दहीवाडे आदींनी परिश्रम घेतले.