देवळा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्तापितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:34 AM2021-01-19T04:34:57+5:302021-01-19T04:34:57+5:30
वडवणी : तालुक्यातील महत्त्वाच्या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावातील मातब्बर प्रस्थापित नेते मंडळींना धक्का देणारे निकाल लागले ...
वडवणी : तालुक्यातील महत्त्वाच्या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावातील मातब्बर प्रस्थापित नेते मंडळींना धक्का देणारे निकाल लागले असून, देवळा ग्रामपंचायतमध्ये माजी संरपचांचा पराभव झाला आहे. दिग्गज गाव नेत्यांनी मात्र आपले गड राखण्यात यश मिळविले.
तालुक्यातील महत्त्वाच्या सोन्नाखोटा येथील ग्रामपंचायतमध्ये सात सदस्य बिनविरोध निवडून आले होते, तर दोन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. नागरगोजे नवनाथ गोविंद यांना २१२ मते तर लोंढे अश्विनी श्रीमंत २०६ मते घेऊन निवडून आल्या. देवळा ग्रामपंचायतची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात राष्ट्रवादीचे ६ तर भाजपाचे ५ उमेदवार निवडून आले. निर्मला इंद्रमोहन जावळे २४६, पल्लवी विठ्ठल शिंदे २३१, सुशील भगवान शिंदे ३६४, सिंधू अभिमान कदम ३५०, शितल सुरेश डोंगरे ३६८, पवार परविश अर्जुन ३१९, अशोक केरबा दामोधर २५२, शिवकन्या देवीदास सपकाळ २९०, सुषमा विजय जावळे २९४, शिल्पा सुरेश शिंदे ३३६, सीमा बाळासाहेब डोंगरे ३०० मते घेऊन उमेदवार विजय झाले आहेत. भाजपच्या माजी सरपंच किस्किंदा रेडे यांचा ६७ मतांनी पराभव झाला आहे, तर डाॅ.सुरेश शिंदे व डोंगरे यांच्या गटाचे ६ सदस्य निवडून आल्याने देवळा ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व बनले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल नरसाळे यांनी काम पाहिले. यावेळी सपोनि नितीन मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांनी चोख बंदोबस्त तैनात करून शातंता राखण्यासाठी प्रयत्न केले. निवडणूक निकाल जाहीर होताच, तहसील कार्यालयाच्या परिसरात शांततेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.