कृषी विभागाची चोरांबा येथे शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:58+5:302021-07-30T04:34:58+5:30
चोरांबा येथे आत्माचे प्रकल्प संचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. जी. मुळे व तालुका कृषी अधिकारी एस. डी ...
चोरांबा येथे आत्माचे प्रकल्प संचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. जी. मुळे व तालुका कृषी अधिकारी एस. डी शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय बोंडअळी नियंत्रण या विषयावर शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. शेती शाळेमध्ये आजच्या वर्गात कापसावरील कीड व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन विषयी माहिती सांगण्यात आली, तसेच बुरशीनाशक याचा योग्य उपयोग, योग्य वेळी कसा करावा, याविषयी सखोल माहिती सांगण्यात आली. आजच्या वर्गात कापूस उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला.
या शेतकऱ्यांच्या शेतीशाळा त महागडे रासायनिक कीटकनाशके न वापरताही सेंद्रिय पद्धतीने अल्प खर्चात ही कशा प्रकारे वापरता येतात, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे कापूस या पिकावर रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे यामध्ये प्रामुख्याने काळा मावा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. याच्या नियंत्रणासाठी एखाद्या बुरशीनाशक व मायक्रोन्यूटन या कीटकनाशकाची फवारणी करावी व इतर किडी विषयी कृषी सहाय्यक श्रीनिवास अंडील यांनी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी समाधान वाघमोडे , आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बिपीन डरपे ,धस , संतोष देशमुख व परिसरातील शेतकरी उपस्थित होते, शेती शाळा यशस्वी करण्यासाठी चोरंबा येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी शेतीशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले
290721\img-20210729-wa0041.jpg
चोरांबा येथे शेतीशाळा संपन्न