कडा येथून मदन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पालखीत हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2023 13:04 IST2023-06-20T13:04:43+5:302023-06-20T13:04:55+5:30
कडा शहरात पालखीचे आगमन होताच मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे पालखीचे स्वागत केले.

कडा येथून मदन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पालखीत हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन
बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथून संत मदन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. या पालखी सोहळ्याचे हे १९ वे वर्ष असून याच हिंदू/ मुस्लिम एकतेचे दर्शन घडले आहे.
कडा शहरात पालखीचे आगमन होताच मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे पालखीचे स्वागत केले. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. ही दिंडी बबन महाराज बहिरवाळ यांच्या मार्गदर्शनात पंढरपूरला मार्गस्थ झाली. मुस्लिम समाज बांधवांकडून वारकऱ्यांना अल्पोपहार वाटपाची ही परंपरा आजतागायत कायम राखण्यात आली आहे.