खरीप पीककर्ज जमा करा, अन्यथा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:37 AM2021-09-23T04:37:44+5:302021-09-23T04:37:44+5:30
गेवराई : जून २०२१ मध्ये दाखल केलेल्या पीककर्जाचे प्रस्ताव मंजूर होऊनही अद्याप या कर्जाची रक्कम कर्ज खात्यावर जमा झाली ...
गेवराई : जून २०२१ मध्ये दाखल केलेल्या पीककर्जाचे प्रस्ताव मंजूर होऊनही अद्याप या कर्जाची रक्कम कर्ज खात्यावर जमा झाली नाही. यामुळे २८ सप्टेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया मादळमोही शाखेसमोर येथील शेतकरी आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
हे प्रस्ताव मंजूर असून त्याबाबत आम्हा शेतकऱ्यांच्या सह्याही बँकेकडून घेण्यात आलेल्या आहेत. परंतु अद्याप पीककर्जाची रक्कम आमच्या कर्ज खात्यावर बँकेकडून जमा करण्यात आलेली नाही. वेळोवेळी शाखा अधिकाऱ्यास विनंती करूनही आम्हा शेतकऱ्यांचे पीककर्ज हे कर्जखात्यावर वर्ग करण्यात आलेले नाही. २७ सप्टेंबरपर्यंत पीककर्ज खात्यावर जमा न झाल्यास २८ सप्टेंबर २०२१ पासून आम्ही सर्व शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
शिवसेनेचे माजी सभापती पंढरीनाथ लगड, विनायक तळेकर, गणेश मासाळ, ताहेरखान पठाण, शिवाजी माखले, फत्तेखान पठाण, हनुमान गोडसे, विठ्ठल गोडसे, सत्तार खतीब, किसन काचुळे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.