का संपतेय सहनशीलता? ८ तासांच्या आत तिघांच्या आत्महत्या; तीन गावांवर शोककळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 03:32 PM2022-02-24T15:32:05+5:302022-02-24T15:33:17+5:30

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी, राजेगाव, केसापुरी कॅम्प येथील घटना 

Depressed soul; Three commit suicide within 8 hours; Mourning over three villages | का संपतेय सहनशीलता? ८ तासांच्या आत तिघांच्या आत्महत्या; तीन गावांवर शोककळा 

का संपतेय सहनशीलता? ८ तासांच्या आत तिघांच्या आत्महत्या; तीन गावांवर शोककळा 

googlenewsNext

माजलगाव ( बीड ): तालुक्यातील राजेवाडी, राजेगाव, केसापुरी कॅम्प येथील तीन ठिकाणी १९ वर्ष, ४० वर्ष , ३७ वर्ष वयांच्या तिघांनी नैराशाच्या  वेगवेगळ्या कारणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बुधवारी रात्री ८ ते गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंत अवघ्या १२ तासांच्या आत या तीन घटना घडल्या आहेत.

१९ ते ४० वयांच्या या तिघांनी जीवन संपवल्याने नैराश्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे.  पहिली घटना, मुळचे धारूर येथील रहिवासी शिक्षक सुरेश रामकिसन बडे ( ३७, रा. गावंदरा, ता. धारूर ) हे माजलगाव शहरालगत केसापुरी कॅम्प येथे राहत होते. त्यांनी नैराश्यातून आज पहाटे ३ वाजता घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बडे ( ५८ ) यांच्या निदर्शनास आली.

तर दुसऱ्या एका घटनेत तालुक्यातील राजेवाडी येथील कृष्णा बालासाहेब कोके (१९) या युवकाने बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास बेल्टच्या सहाय्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

तिसऱ्या घटनेत तालुक्यातील राजेगाव येथील रामचंद्र धुराजी गरड (४० ) याने पैशाच्या सततच्या तगाखाद्याला कंटाळून बबन लालसिंग चव्हाण यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला आज पहाटे ४ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

आत्महत्येच्या या घटनेने तिन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. या आत्महत्या प्रकरणी कार्यक्रम ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव, दिंद्रुड पोलीस स्टेशन व माजलगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Depressed soul; Three commit suicide within 8 hours; Mourning over three villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.